ग्रामपंचायत माहिती
सोमठाणे गाव हे महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यात वसलेले आहे. हे गाव मा. नामदार श्री. माणिकराव शिवाजीराव कोकाटे यांचे मूळ गाव असून तालुक्यापासून सुमारे ४० कि.मी. अंतरावर आहे. सोमठाणे गाव देव नदीच्या किनाऱ्यावर वसलेले असून जवळच देव नदी व गोदावरी नदी यांचा संगम आहे.
गावातील मुख्य व्यवसाय शेती असून सुमारे ९०% क्षेत्र ओलिताखाली आहे. शेतीबरोबरच दुग्ध व्यवसाय हा जोडधंदा म्हणून मोठ्या प्रमाणावर केला जातो. शेतीमालासाठी निफाड व लासलगाव या प्रमुख बाजारपेठा जवळ आहेत.
गावाची एकूण लोकसंख्या ३३४४ असून त्यामध्ये पुरुष १७१४ व स्त्रिया १६३० आहेत. गावात ६७२ कुटुंबे, ४ वार्ड व ३०५५ मतदार आहेत. अनुसूचित जातीची लोकसंख्या ३०३, अनुसूचित जमातीची ५०७ असून उर्वरित लोकसंख्या २५३४ आहे.
गावात प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, खाजगी दवाखाने व पशुवैद्यकीय दवाखाना, तसेच अंगणवाड्या, प्राथमिक व माध्यमिक शाळा उपलब्ध आहेत. निर्मल ग्राम पुरस्कार व संत गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियान अंतर्गत गावाने उल्लेखनीय कामगिरी केली आहे.